दिव्यांग व्यक्तींना पालिकेतर्फे झेरॉक्स मशीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महापालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्कूटरपाठोपाठ आता झेरॉक्स मशीन देण्यात येणार आहे. मुंबईतील कायम रहिवासी असलेल्या 300 दिव्यांगांना या योजनेअंतर्गत ही मशीन दिली जाणार असल्याची माहिती महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

पालिकेच्या नियोजन आणि दारिद्रय़ निर्मूलन विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना हाताला काम मिळावे या हेतूने झेरॉक्स मशीन देण्यात येणार आहे. याकरिता संबंधित विभागाने योजना तयार केली असून त्याकरिता पालिका 3 कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. पालिकेने यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्कूटर देण्याचे ठरवले होते. त्याबाबत अर्ज मागवण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. त्याचबरोबर आता ज्या दिव्यांग व्यक्तीकडे रोजगार नाही त्यांना हे मशीन देण्यात येणार आहे.