कर्नाटकात काली नदीमध्ये बोट बुडाली; 16 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकच्या कारवार येथे काली नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांचा बचाव पथकाकडून शोध सुरू आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. बोट दुर्घटनेमागील कारण समजलेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बोटीवर 24 प्रवाशी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुरुवातीला 6 जणांचे मृतदेह हाती लागले. अधिक शोध घेतल्यानंतर आणखी दहा जणांचे मृतदेह मिळाले. मृतांची संख्या आता 16 झाली असून अद्यापही 8 जण बेपत्ता आहे. बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे.