Video अभिनेत्री सई ताम्हणकरने धरला तारपा नृत्यावर ठेका

नवरात्रीच्या गरबा उत्सवात प्रथमच आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या तारपा लोककलेची झलक विश्वास फाउंडेशनमार्फ़त आयोजित बोईसर रास रंग 2023 च्या गरबा आयोजनात दिसली. सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने या कार्यक्रमाला हजेरी लावत तारपा नृत्यावर चांगलाच ठेका धरला. स्थानिक आदिवासी नृत्य समूहासह सईने तारपाचा मनमुराद आनंद लुटला. प्रथमच सई पालघर जिल्ह्यात आली होती. पालघरकरांच्या मिळालेल्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे सईने यावेळी म्हटले व उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

विश्वास फाउंडेशनमार्फत बोईसर सर्कस मैदानात बोईसर रास रंग 2023 उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दररोज पारंपरिक गरबा संगीताच्या तालावर हजारो गरबा प्रेमी या नवरात्र उत्सवाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. या कार्यक्रमातून बोईसरवासीयांसाठी एक आनंद देता आल्याचे समाधान विश्वास फाउंडेशनचे डॉ. विश्वास वळवी यांनी व्यक्त केले. या गरबा कार्यक्रमात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, छोट्या व मोठ्या पडद्यावरील सिने तारका, अभिनेते, राजकीय मंडळी भेटी देत आहेत.

दररोज रास गरबामध्ये अनेक गायक विविध प्रकारची गरबा गाणी गाऊन आपली छाप श्रोत्यांवर पाडत असली तरी या गरब्याच्या आदिवासी लोकसंस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या तारपा वाद्याच्या तालामुळे उत्सवाला व गरबा नृत्य करणार्याच्या पसंती मिळत आहे. आदिवासी संस्कृतीची छटा, गाणी या कार्यक्रमात वाजवली जात असल्याने या कार्यक्रमात जिल्ह्याच्या संस्कृतीची छाप पडत असल्याचे वळवी यांनी म्हटले आहे. गरबा प्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन विश्वास फाउंडेशनने केले आहे.