युवराजच्या हॅटट्रिकची सॅम करणकडून पुनरावृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मोहाली

किंग्ज इलेव्हन पंजांबचा वेगवान गोलंदाज सॅम करण याने यंदाच्या ‘आयपीएल’मधील हॅटट्रिकचा पराक्रम केलाय. मोक्याच्या वेळी त्याने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्ली कॅपिटलच्या घशापर्यंत गेलेला सामना अक्षरशः खेचून आणला, मात्र सॅम  करणच्या या हॅटट्रिकला दहा वर्षांपूर्वी युवराज सिंगने मिळविलेल्या हॅटट्रिकच्या पुनरावृत्तीचे कोंदण लाभले. योगायोग म्हणतात तो यालाच.

युवराज सिंगने पंजाब संघाकडूनच खेळताना ‘आयपीएल’मध्ये हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. सॅम करणनेही आज याच संघाकडून हा पराक्रम केला. विशेष म्हणजे दोघेही डावखुरे गोलंदाज. युवी आणि सॅम यांनी दोघांनीही दोन षटकांमध्ये हॅटट्रिक मिळविली.

पंजाबचा तिसरा ‘हॅटट्रिककीर’

पंजाबच्या संघाकडून सर्कप्रथम युकराज सिंगने बंगळुरू संघाकिरुद्ध 2009 साली हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर त्याच कर्षी डेक्कन चार्जर्स संघाकिरुद्धही त्याने हॅटट्रिकचा पराक्रम केला. अक्षर पटेलने 2016 साली गुजरात लायन्स संघाकिरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर सॅम करण हा तिसरा हॅटट्रिककीर ठरला, तर पंजाबची ही चौथी हॅटट्रिक होय.  

सॅम करण खास क्लबमध्ये सहभागी

‘आयपीएल’मध्ये अमित मिश्रा (2013) व प्रवीण तांबे (2014) यांनी तिन्ही फलंदाजांना शून्यावर बाद करून हॅटट्रिकचा पराक्रम केलेला आहे. या वर्षी सॅम करण हाही या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. कारण सॅम करण यानेही तिन्ही फलंदाजांना शून्यावर बाद करून हॅटट्रिक साजरी केली.