
विमानातील विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक ब्राझीलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विंडो सीटसाठी एक महिलेने विमानात जबरदस्त राडा घातला. सहप्रवाशाला शिवीगाळ करुन सुरु झालेले भांडण अखेर हाणामारीपर्यंत पोहोचले. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला.
ही घटना ब्राझीलच्या एका विमानातील आहे. मीडिया वृत्तानुसार, 2 फेब्रुवारी रोजी ही घडली आहे. विमान जी3-1659 टेकऑफच्या आधी हा हंगामा सुरु झाला. वृत्तानुसार, विमानात विंडो सिट होती आणि महिला प्रवाशासाठी ती नव्हती. ती आपल्या मुलासोबत तिथे आली आणि तिने विेंडोजवळ बसलेल्या माणसाला उठायला सांगितले. त्या माणसाने उठायला नकार दिला. ही गोष्ट महिलेला खटकली आणि तिने त्याला सुनवायला सुरुवात केले. नंतर हळहळू हे प्रकरण एवढे वाढले की हाणामारीवर आले. हे बघून महिलेचे कुटुंब धावले आणि त्यांनी त्या प्रवाशाची कॉलर पकडली. त्यांनीही त्याला मारायला सुरुवात केली,
Massive brawl breaks out on airline flight to Brazil… over a window seat. pic.twitter.com/zTMZPYzzDy
— Mike Sington (@MikeSington) February 3, 2023
कोणाला काही समजत नव्हते. दोन तास हे नाट्य सुरु होते. इथे दोन्हीकडचे कुटुंबिय भांडत होते. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पायलटने जाऊन सर्वांना शांत केले. त्यांच्या राड्यामुळे विमानाला दोन तास उशीर झाला. या प्रकरणानंतर एअरलाइनची प्रतिक्रिया समोर आली आहे.