आता पुरुषांसाठीही आले गर्भनिरोधक जेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही आहे. कारण पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक जेल येणार आहे. या जेलने गर्भधारणा रोखण्यास मदत मिळणार आहे. ब्रिटनमध्ये हे जेल बनविण्यात आले आहे.

गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे सर्वात प्रभावी उपाय आहे. मात्र त्या गोळ्या योग्य पद्धतीने न घेतल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. ब्रिटनमध्ये या जेलची चाचणी यशास्वी झाली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, एका 32 वर्षाच्या जोडप्याने एडिनबर्ग येथे पुरुष हार्मोनल गर्भनिरोधक जेलच्या वैद्यकिय चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. ईडी आणि फिओना असे या जोडप्याचे नाव आहे. यामध्ये त्याची प्रेयसी फिओनाने त्याला साथ दिली. हे जेल लावल्याने गर्भ राहिला नाही. मात्र त्याचे काही साईड इफेक्ट्स या जोडप्यामध्ये दिसून आले. यातील पुरुषाचे वजन वाढले. त्यामुळे सध्या याचे साईड इफेक्ट्स न व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ईडीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका रुग्णालयाच्या बाहेर या जेलच्या वैद्यकीय चाचणीसाठी स्वयंसेवक हवे असल्याची जाहिरात वाचली होती. ती जाहीरात पाहून या जोडप्याने त्या चाचणीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घराशेजारील इंडिबर्ग येथे त्यांची चाचणी घेण्यात आली, हे जेल लावल्याने पुरुषांच्या अंडकोषाद्वारे शुक्राणू तयार होणे बंद झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे जेल लावणे बंद केल्यावर शुक्राणू पुन्हा तयार होऊन सुरक्षित गर्भधारणा होऊ शकते.

कशी झाली चाचणी?

नियमित आंघोळ केल्यानंतर ईडी त्याच्या खांद्यावर आणि छातीवर हे जेल लावायचा. वैद्यकिय चाचणी करणाऱ्या टिममध्ये असलेल्या  डॉ.ज़ॉन रेनॉल्ड्स यांनी सांगितले की, प्रतिमिलीलीटर विर्यामध्ये दहालक्ष शुक्राणु असतात. हे जेल लावल्यानंतर अंडकोषात 99टक्के शुक्राणु तयार होणे बंद झाले. तसेच शारीरीक संबंध ठेवताना त्या जेलचे काही दुष्परिणाम जाणवले नाही.

”हे लावल्यावर रात्री कधीतरी अंगात उष्णता वाढल्यासारखी जाणवायची. खूप घाम यायचा. मात्र सेक्स करताना कधी काही वेगळे जाणवले नाही.  मात्र जेल लावायला सुरुवात केल्यापासून माझे तीन ते चार किलो वजन वाढले आहे. वजन वाढल्यामुळे मला थोडा त्रास झाला, असे ईडीने सांगितले. तर अचानक गरोदर राहण्याची भीती ही यात नसल्याने मी आऩंदी असल्याचे त्याची प्रेयसी फिओना सांगते. या जेलचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता ही कंपनी आता सरकारकडून यासाठी परवानगी मागणार असून लवकरच हे जेल मार्केटमध्ये आणण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे.

या जेलमुळे ईडीची प्रेयसी फिओना फार आनंदी आहे. ही दोघं गेली आठ वर्षे नात्यात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला सेक्स करताना अनियोजित गर्भधारणा होण्याची चिंता असायची. मात्र आता तशी चिंता नाहीय. ईडी गेले वर्षभर या जेलचा वापर करतोय. त्याने थोडा फार त्याच्या वजनावर परिणाम झाला मात्र त्याने लव्हलाईफचा आधीपेक्शा आता जास्त आनंद घेतोय.