स्कायडाईव्हनंतर हवेत सेक्स करणं पडलं महागात, वाचा काय झाली या दाम्पत्याची अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली अॅडव्हेंचरस सेक्सच्या नावाखाली अनेक जोडपी वेगवेगळ्या प्रकारे शरीरसंबंध ठेवण्याचे प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न ब्रिटनमधील लेस्ली व विलियम यांनी देखील केला. त्यांचा प्रयत्न यशस्वीही झाला. मात्र पुढे जे काही घडलं ते त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवून गेलं.

लेस्ली ही सेक्शुअली फार अॅक्टिव्ह आहे. तिला सेक्स करताना कायम काहीतरी वेगळं करण्याची हौस असते. त्या दोघांनी स्काय डाईव्ह करायचं ठरवलं होतं. इथेही लेस्लीच्या डोक्यातील सेक्सच खूळ काही गेलं नाही. आकाशात सेक्स करण्याची तिची इच्छा झाली. तिने ती इच्छा विलियमकडे बोलून दाखवली. विलियमने पण ती मान्य केली. त्या दोघांना वाटलेलं आपण हे सहज निभावून नेऊ.

स्काय डाईव्हचा दिवस उजाडला. ते दोघेही या वेगळ्या प्रकारासाठी फार उत्सुक होते. आकाशात असताना योग्य प्रकारे उत्तेजित होण्यासाठी त्यांनी फ्लाईटमध्येच एकमेकांना किस करायला सुरुवात केली होती. ज्यावेळी तेथील ट्रेनरने त्यांना विमानातून बाहेर ढकलले. ते दोघे एकमेकांसोबत सेक्स करू लागले. आकाशातही त्यांनी यशस्वीरित्या शरीरसंबंध ठेवले. मात्र या सेक्समध्ये विलियम इतका गुंतला की तो त्याचे पॅऱाशूट खोलायलाच विसरला.

सेक्सनंतर जेव्हा त्या दोघांनी डोळे उघडले तर पाहिलं तर काय ते दोघे जमिनीच्या अगदी जवळ होते. लेस्लीचे पॅऱाशूट वेळीच उघड़ले गेले त्यामुळे ती हवेत तरंगत पुढे गेली तर विलियम चांगलाच जमिनीवर आदळला. लेस्ली जेव्हा त्याला शोधत घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्याला पाहून तिला धक्काच बसला. सुरुवातीला तिला असे वाटले की यात विलियमचा मृत्यू झाला असेल. मात्र सुदैवाने त्याचा हा अपघात फक्त नाकावर निभवला. विलियमच्या नाकाला दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी खरचटले आहे.