Buldhana News – बिल मंजुरीसाठी 3 टक्के लाच; विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना ८.५० लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ३ टक्के लाचेची मागणी केल्याप्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात सापळा रचून करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एपीआय स्वप्नील निराळे यांच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना मोरे यांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षण अधिकारी राजेश राठोड, पोलीस उपअधिक्षक, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे, पोलीस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, चालक अंमलदार राजेश बहीरट यांनी पार पाडली.