
बीड जिल्ह्यातील वैजनाथाच्या परळी नगरीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या गोल रिंगणाने हजारो भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे जात असताना वैद्यनाथाच्या परळीत नामदेव महाराजांच्या पालखीचे डोळ्याचे पारणे फेडणारे गोल रिंगण पार पडले. ज्ञानोबा-तुकाराम व श्री नामदेव महाराजांचा जयघोष यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या रिंगण सोहळ्यात अश्व, टाळकरी, भजनी मंडळी, भुजंग आचार्य तसेच मोठ्या संख्येने भाविक, महिला आणि वारकर्यांनी सहभाग घेतला. दरम्यान परळीकरांकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. यंदा या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे पाचवे वर्ष आहे.































































