
शहरातील विविध भागांत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून 2 लाख 30 हजारांवर ऐवज चोरून नेला. या घटना वडगाव शेरी, वाघोली आणि उरळी देवाची परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी येरवडा, लोणीकंद, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावाच्या वाढदिवसाला गेलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी 1 लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना 1 ते 4 जूनदरम्यान वडगाव शेरीतील घरोंदा सोसायटीत घडली. याप्रकरणी जोत्स्ना गायकवाड (58) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून सोन्या-चांदीचे दागिने मिळून 1 लाख 6 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 4 जूनला रात्री साडेनउच्या सुमारास वाघोलीतील मॅपल वूडस सोसायटीत घडली. याप्रकरणी सुनील किशोर शहा (42) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बंद घराचा दरवाजा उघडून संसारपयोगी 22 हजारांवर साहित्य चोरणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना 3 जूनला उरळी देवाची परिसरातील साईनिवास सोसायटीत घडली. योगेश शेलार (20, रा. येरवडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. बिनी अनिलकुमार कांबळे (40) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.



























































