पोलिसांच्या भीतीने दारू वाहून नेणारी गाडी सुसाट, अपघातात 1 ठार

1753

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा दरम्यान टाकळी फाट्यावर रात्री एका स्विफ्ट गाडीचा अपघात झाला. दारू वाहून नेणारं हे वाहन होतं. पोलिसांच्या भीतीमुळं अतिवेगानं गाडी चालवल्यामुळं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला, तर एक जखमी आहे. सकाळी ही घटना माहीत होताच लोकांनी वाहनातून बाहेर पडलेल्या मद्याच्या बाटल्या लांबवल्या. ज्याला जे मिळेल, ते पळवण्यात आलं. मद्यपीना तर ही पर्वणीच झाली.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या