
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडणार आहे. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच हा आठ आसनी कोच असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध असेल. ट्रेनच्या वेळा आणि एसी सलून कोचचे शुल्क जाहीर करण्यात आले आहेत.
नेरळ ते माथेरान
ट्रिप A- नेरळ प्रस्थान सकाळी 08.50 वा., माथेरान आगमन सकाळी 11.30 वा.
ट्रिप B- नेरळ प्रस्थान सकाळी 10.25 वा., माथेरान आगमन दुपारी 01.05 वा.
माथेरान ते नेरळ
ट्रिप C- माथेरान प्रस्थान 02.45 वा., नेरळ आगमन दुपारी 04.30 वा.
ट्रिप D- माथेरान प्रस्थान दुपारी 04.00, नेरळ आगमन संध्याकाळी 06.40 वा
भाडे रचना
- एकाच दिवशी राऊंड ट्रिप पूर्ण होईल. आठवड्यातील दिवशी 32,088 रुपये करांसहीत.
- आठवड्याअखेरीस (वीकेंडला) 44,608 रुपये करासह.
- एकाच दिवसाच्या राऊंड ट्रिपच्या प्रवासासाठी, ए+सी किंवा बी+डी यापैकी एकाचा पर्याय निवडता येतो.
- रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी 32,088 रुपये करांसहीत आणि 1500 रुपये प्रति तासाने.
- आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी 44,608 रुपये करांसह + डिटेंशन शुल्कासह 1800 रुपये प्रति तासाने.
- कोणीही A किंवा B आणि परतीसाठी C किंवा D यापैकी एक पर्याय निवडू शकतो.
इच्छुक पार्टी निवडलेल्या प्लॅनच्या एकूण भाड्याच्या 20 टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या 7 दिवस अगोदर 10,000 रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेवीसह एसी सलून बुक करू शकतात. उर्वरित 80% प्रवासाच्या तारखेच्या 48 तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाली असे मानले जाईल. 48 तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.
मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर UPI, POS किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते. जर नेरळ व्यतिरिक्त इतर स्टेशनवर पैसे भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या 1 दिवसाच्या आत कळवावे. अधिक माहितीसाठी, कृपया मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ यांच्याशी संपर्क साधा.
नेरळ-माथेरान टॉय ट्रेन 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, ही देशातील मोजक्या पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे आणि टॉय ट्रेनमध्ये एसी सलूनमधून प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभव आहे. तसेच निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाचाही आनंद घेता येतो. या टॉय ट्रेनला पर्यंटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.





























































