चाळीसगावच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.

हनुमानवाडी परिसरातील महेंद्र मोरे हे कार्यालयात बसलेले असताना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)