चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकरांवरील वक्तव्यानंतर पिंपरीत राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली आहे. पैठणच्या कार्यक्रमामध्ये महापुरुषांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे पडसाद शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये उमटले. एका कार्यक्रमाला जाताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पोलिसांसमक्ष झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली.

महासाधू मोरया गोसावी समाधी महोत्सवासाठी चिंचवड गावात आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पैठण येथील एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद सर्वत्र दिसून आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, पिंपरी- चिंचवड येथे असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही शाईफेक कोणत्या संघटनेकडून करण्यात आलीय हे स्पष्ट झालेले नाही. भाजपचे माजी नगरसेवक ऍड मोरेश्वर शेडगे यांच्या निवास्थानातून बाहेर पडत असताना आंदोलकांनी त्यांच्यावर शाईफेक करत घोषणाबाजी केली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करण्याचा अफजलखानी विडाच उचलला आहे. जेथे संतमहंतांचे विचार शिकवले जातात त्या पैठण येथील संतपीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या थोर पुरुषांचा घोर अवमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या पैठण येथील संतपीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पालकमंत्री संदिपान भूमरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पैठण परिसरात वारकरी शिक्षण संस्था चालवणारे अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. ‘कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांनी भीक मागून शाळा उभारल्या त्यांनी सरकारकडे अनुदान मागितले नाही, मग तुम्ही कशाला सरकारी अनुदान मागता?’ असा सवाल त्यांनी उपस्थित संस्थाचालकांना केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)