चंद्रपूरच्या सीमा वाहतूकीसाठी बंद

955

कोरोनाचा प्रसार लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आजपासून जिल्ह्याच्या सीमा वाहतुकीसाठी बंद केल्या. कोणतीही शासकीय किंवा खासगी बस जिल्ह्यात येणार नाही आणि बाहेर जाणार नाही. प्रवासी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. केवळ महत्त्वाच्या कामासाठी वैयक्तिक वाहनानं बाहेरगावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र प्रवेश खुला आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर अशाप्रकारचे आदेश देण्यात आल्यानं लोकांनी हे आदेश पाळावे, असं आवाहन जिल्हाधिकाऱी कुणाल खेणवार केलं आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू असल्यानं लोकांना एकत्रित येता येणार नाही. जीवनावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं आणि रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या