चंद्रपूर – दुचाकीच्या धडकेत बस पलटली, दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीने समोरून येत असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. या अपघातात बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील उमा नदी जवळील पुलाजवळ घडली.

या अपघातातील मृतांची नावं प्रफुल गुरुनुले (27), संदीप कोकोडे (31) अशी आहेत. बस मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचत जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.