चिप्सच्या पाकिटात हवा का असते? जाणून घ्या काय आहे कारण…

चिप्सच्या पाकिटात हवा का असते? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नच उत्तर सांगणार आहोत. हवा म्हटली की आपल्याला फक्त प्राणवायू (ऑक्सिजनच) आठवतो, परंतु तसे नाही. आपल्याला वाटत की एखादा पदार्थ बनवून झाल्यावर एका ठराविक वेळेनंतर तो खराब व्हायला लागतो आणि मग कालांतराने हळू-हळू खराब होतो. मात्र असे अजिबात नाही. जेव्हा तो पदार्थ बनतो अगदी त्याच क्षणापासून तो खराब व्हायला सुरवात होते. ज्यात किण्व प्रक्रिया ,मायक्रोब्सची वाढ, त्यांची चलबिचल लगेच सुरु होते आणि पदार्थ हळू-हळू खराब होऊन त्यातून वास यायला लागतो.

आता ह्या बक्टेरीयाची वाढीमागे नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत आहेत? तर ह्याच उत्तर आहे “ऑक्सिजन वायू”. बटाटा हा पिष्टमय पदार्थ (स्टार्च) आणि पाणीच्या संयुगाने बनलेला असतो. जेव्हा चिप्स बनवून ते तळले जातात तेव्हा प्राणवायूचा संपर्क चिप्समध्ये असलेल्या स्टार्च आणि पाण्याशी येतो आणि तेथे “आॅक्सिडेशन” प्रक्रिया सुरु होते आणि बक्टेरीयाची वाढ लवकर व्हायला सुरु होते. परिणामी चिप्स कुजायला लागतात. स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि त्यांची चव आणि अन्नमूल्य (न्युट्रीशन वल्यू) कमी होत जातात.

आता एवढे सगळे होते ते “ऑक्सिजन” वायूमुळे. म्हणून चिप्सच्या पाकिटात ऑक्सिजन नसतो. त्यात असतो नायट्रोजन. नायट्रोजन वायू उदासीन (न्युट्रल) असल्यामुळे त्याचा चिप्समधील स्टार्चशी प्रक्रिया होत नाही परिणामी चिप्समधील मायक्रोब्सची वाढ होण्यास आळा बसतो आणि चिप्स बराच काळ टिकतात. नायट्रोजन वायू चिप्सच्या पाकिटात खूप जास्त दबावात भरलेला असतो, ज्यामुळे तिथे एक पोकळी तयार होते. ज्यामध्ये चिप्स पूर्णपणे बंदिस्त राहतात आणि त्यामुळे मायक्रोब्सची वाढ हळू-हळू होते.

तरीसुद्धा हा नायट्रोजन वायू मायक्रोब्सची वाढ पूर्णपणे थांबवू शकत नाही. मात्र चिप्स बरेच महिने टिकतात म्हणून त्यावर लिहिलेलं असते, “Best Before Three-Four Months Of Packaging” आणि हे सुद्धा लिहलेलं असते की “Do Not Buy If Tampered” म्हणजेच जर पाकीट फाटलेलं असेल, तर विकत घेऊ नका कारण त्यात हवेतील ऑक्सिजनमुळे मायक्रोब्सची वाढ झपाट्याने सुरु झालेली असते. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना कमलाकर विजय ठाकरे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या