
नाशिकमधील टीसीएस आयटी पंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. धर्मांतरासारखे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका. तसेच या प्रकरणातील सर्व संभाव्य पॅटर्न आणि अँगल्स तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला दिले. अमली पदार्थाच्या सर्व लिंक्स शोधून काढण्याचेही आदेश यावेळी दिले.
कायदा व सुव्यवस्था आणि संवेदनशील प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी गृह विभागाची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. अशोक खरात प्रकरणातील तपास हा कायदेशीरदृष्टय़ा भक्कम असावा. न्यायालयात केस मजबूत राहण्यासाठी ठोस आणि भक्कम पुरावे गोळा करा. अपराध सिद्ध होणे हा तपासाचा पेंद्रबिंदू असावा. त्यासाठी तपास यंत्रणांनी काटेकोरपणे काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

























































