
पश्चिम बंगाल, आसाम आणि तामीळनाडूमध्ये विधानसभेसाठी मतदान तोंडावर असताना मोदी सरकारने पेंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवला आहे. या निर्णयानंतर आता पगारामध्ये महागाई भत्ता 60 टक्के झाला आहे. 1 जानेवारी 2026पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून जानेवारी महिन्यापासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळेल. पेंद्र सरकारचे सुमारे 50.5 लाख कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होईल.
पगार किती वाढणार?
महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढल्यामुळे सुमारे 600 रुपयांची वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार आहे. साधारणतः 30 हजार रुपये बेसिक पेमेंटवर आता 18 हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. हा आकडा आधी 17,400 रुपये होता.





























































