भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फसवणूक व महिलांचे लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला शनिवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पाचव्या गुह्यात त्याला उद्या रविवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्याने एसआयटीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी खरातला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. आता पाचव्या गुह्यात रविवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.