
कॉमेडी ड्रामा ‘डॉक्टर जी’ चित्रपट 25 डिसेंबर रोजी 8 वाजता झी सिनेमावर पाहता येईल. अनुभूती कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराणा, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘डॉक्टर जी’ ची कथा डॉ. उदय गुप्ता यांची असून ही भूमिका आयुष्मानने साकारली आहे. ऑर्थोपेडिक्समध्ये करीअर करण्याचे स्वप्न बाळगलेल्या उदयला अखेर गायनॉकॉलॉजीच्या जगतात प्रवेश करावा लागतो. गायनॉकॉलॉजी हे क्षेत्र सर्वसाधारणपणे स्त्रियांसाठी असल्याचे मानले जाते. उदय मनाविरोधात गायनॉकॉलॉजिस्ट बनतो, ते स्वीकारण्यासाठा आव्हानांना तोंड द्यावे लागते.






























































