राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या स्क्वॉश संघात 14 वर्षीय अनाहत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बर्मिंगहॅम येथे होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मंगळवारी घोषित झालेल्या हिंदुस्थानी स्क्वॉश संघात 14 वर्षीय अनाहतला स्थान देण्यात आले आहे. दिल्लीच्या या युवा खेळाडूने 15 वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

नुकतेच तिने जर्मनी येथील स्पर्धेत जेतेपद पटकावले, तर जूनमध्ये आशियाई किताब मिळवला. या कामगिरीच्या जोरावरच तिला हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले. पुरुष दुहेरीत वेलावन सेंथिलकुमार आणि अभय सिंग यांना राष्ट्रकुलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे.