मलबार हिलचे नाव ‘रामनगरी’ हवे! सुधार समिती अध्यक्षांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दक्षिण मुंबईतील सर्वात व्हीआयपी म्हणून ओळख असलेल्या मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ ठेवण्याची मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली. ठरावाच्या सूचनेद्वारे त्यांनी ही मागणी केली असून येत्या महासभेसमोर ही सूचना मंजुरीसाठी येणार आहे.

सध्या संपूर्ण देशात शहरांची नावे बदलण्याचे वारे वाहत आहेत. त्यातच आता विभागाचे नाव बदलण्याची मागणी पालिकेमध्येही होऊ लागली आहे. राजकीय नेत्यांचे आणि मंत्र्यांचे बंगले असलेला मलबार हिल या उंच टेकडीवर असलेला भाग आहे. मलबारी लोकांच्या वावरामुळे ब्रिटिश काळापासून हा भाग ‘मलबार हिल’ म्हणून ओळखला जात आहे. गर्द झाडी असलेल्या या टेकडीची प्रभू रामचंद्रांनाही भुरळ पडली होती. प्राचीन काळात सीतेला शोधण्यासाठी लंकेला निघालेले असताना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनीही या परिसरात वास्तव्य केल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. त्यामुळे या भागाचे नाव बदलून रामनगरी ठेवावे अशी मागणी लांडे यांनी केली आहे.