
कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र पालिकेला केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचे डोस मिळत नसल्यामुळे खासगी 73 लसीकरण केंद्रांपैकी बहुतांशी केंद्रे बंद पडली असताना आता पालिकेच्या 39 केंद्रांवरील लसीकरणही उद्या, 25 एप्रिल रोजी डोस संपल्यानंतर बंद पडणार आहेत. मुंबईत दररोज सुमारे 50 हजारांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे काल उपलब्ध झालेला 50 हजारांचा साठा आज लवकरच संपणार आहे.
मुंबईत पालिकेच्या लसीकरण केंद्रांसह राज्य सरकार आणि खासगी मिळून 132 लसीकरण केंद्रांकडून लसीकरण सुरू आहे. दुसऱया लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून खासगी 73 केंद्रांमधील बहुतांशी ठिकाणी लसीकरण आधीच बंद पडले आहे. पालिका आणि सरकारच्या 39 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
अपुऱया साठय़ामुळे पालिकेने दुसरा डोस देण्याला आणि नोंदणी केलेल्यांनाच लसीसाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना लस मिळणे मुश्कील बनले आहे. यातच शनिवार आणि रविवारी नवा साठा मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी उपलब्ध झालेला 50 हजार डोस संपल्यानंतर मुंबईतील पालिका-राज्य सरकारच्या बहुतांशी केंद्रांवरील लसीकरण उद्या बंद होईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
एक लाखाचे उद्दिष्ट कसे गाठणार!
पालिकेने मुंबईत दररोज एक लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून यंत्रणा उभारली आहेत. यासाठी आवश्यक स्टाफ, आरोग्य कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहेत. पालिका, राज्य सरकारच्या मिळून 39 केंद्रांवर लसीकरण सुरूही आहे. आतापर्यंत दिवसाला सुमारे 35 ते 45-50 हजारांचे लसीकरण पेले जात आहे. सुमारे 22 लाख लसीकरण पूर्ण झाले आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आठवडय़ाला 10 लाख लसींचे डोस द्यावेत अशी मागणी पालिकेकडून केली जात आहे, मात्र दिवसाला 40 ते 50 हजार पिंवा एक-दोन दिवसांनी एक लाख डोस पालिकेला उपलब्ध होत आहेत. त्यामुळे दररोज एक लाख डोस देण्याचे उद्दिष्ट कसे गाठणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राने तातडीने आवश्यक लसींचा पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.




























































