क्रिकेटपटू दीपक चहरच्या पत्नीला दहा लाखांचा गंडा, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा प्रसिद्ध गोलंदाज दीपक चहर याची पत्नी जया भारद्वाज हिला दहा लाखांचा गंडा घातला आहे. दीपक चहरच्या वडिलांनी हैद्राबादच्या पारिख स्पोर्ट्सचे मालक ध्रुव पारिख व कमलेश पारिख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaya Chahar (@jayab05)

दीपक चहरच्या वडिलांनी आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात हैद्राबादच्या पारिख स्पोर्ट्सचे मालक ध्रुव पारिख व कमलेश पारिख यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. जयाने ते पैसे एका कराराअंतर्गत दिले होते. मात्र ते काम होत नसल्याने तिने पैसे परत मागितले मात्र पारिख यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

 

दीपक चहरचे कुटुंब हे आग्र्याच्या शाहगंज येथील मान सरोवर कॉलनीत राहते. दीपक चहर हा सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून घेळत आहे. त्याला या संघात घेण्यासाठी संघ मालकांनी तब्बल 14 लाख मोजले आहेत. गेल्या वर्षी चहरने जयाला स्टेडियममध्ये सर्वांदेखत प्रपोज केले होते.