Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’23 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Wednesday, November 23, 2022)
लोकांना नेमके काय हवेय ते समजून घ्यावे लागेल. पैशाची उधळपट्टी करू नका. नवीन मित्र जोडाल. रिकामा वेळ मोबाईल आणि वेबसीरीज पाहण्यात घालवाल. व्यवसायाच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Wednesday, November 23, 2022)
मनात अनावश्यक विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. मानसिक कणखरपणा वाढवा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणुकीचा परतावा योग्य वेळी मिळेल, या विश्वासाने गुंतवणूक कराल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी कार्यालयातून लवकर निघाल. प्रिय व्यक्तिकडून कौतुक होईल. आजचा दिवस आनंददायी आहे.
शुभरंग : जांभळा

मिथुन (GEMINI – Wednesday, November 23, 2022)
गाईला ताजी पोळी खाऊ घाला. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरात सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. नव्या योजना आणि उपक्रमांबद्दल घरातील व्यक्तिंशी बोलून घ्या. स्वत:साठी वेळ काढाल. कुटुंबियांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत छान वेळ व्यतीत कराल. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER – Wednesday, November 23, 2022)
अडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. एकांतात वेळ घालवावासा वाटेल. चेहऱ्यावर स्मितहास्य असू द्या. आरोग्याकडे लक्ष द्या. मनावरील ताण दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. नियमित व्यायामासाठी वेळ काढाल.
शुभरंग : तांबडा

सिंह (LEO – Wednesday, November 23, 2022)
चंद्र प्रकाशात 15 ते 20 मिनिटे बसा. आपल्या मिळकतीचे काही धन धार्मिक कार्यासाठी अर्पण करा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणेची आवश्यकता आहे. कुटुंबियांच्या मतांचा आदर करा. लोकं तुमची प्रशंसा करतील. ताणतणावामुळे मन विचलीत होऊ देऊ नका. कार्यालयातील सहकाऱ्यांना समजून घ्या. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग: राखाडी

कन्या (VIRGO – Wednesday, November 23, 2022)
वाहत्या पाण्यात अक्खा लसूण आणि कांदा प्रवाहित करा. आध्यात्मिक कार्यात भाग घ्यावासा वाटेल. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न कराल. वात्सल्याने वागा. स्वत:साठी वेळ काढाल. कार्यालयातील समस्यांचा त्रास होऊ शकतो. अनावश्यक ताण घेऊ नका.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA- Wednesday, November 23, 2022)
घराच्या खिडक्यांना बदामी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे लावा. मन:शांतीवर परिणाम होऊ देऊ नका. व्यर्थ भांडण करू नका. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. प्रवासामुळे प्रेमसंबंधात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील अंगणात शोभिवंत झाडे लावून त्याची जोपासना करा. आजी-आजोबांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, November 23, 2022)
व्यसनांपासून लांब राहा. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. उल्हसित मनाकडून ऊर्जा मिळेल. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाल. अनपेक्षितपणे गोड बातमी मिळेल. क्षुल्लक कडवड गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. मेहनत आणि चिकाटीने काम करण्याच्या जिद्दीचा फायदा होईल. मैत्रीमुळे महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. आजचा दिवस सर्वोत्तम आहे.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, November 23, 2022)
तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावा. कोणाचेही मन दुखावले जाईल असे वागू नका. प्रिय व्यक्तिच्या कठोर शब्दांनी मन दुखावू शकते, मात्र नंतर प्रेमाचा वर्षाव होईल. झोकून देऊन काम करा. समाजात कौतुक होईल. एकांतात वेळ घालवाल. एखादे आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल. मनाजोगी खरेदी केल्यामुळे आनंदी राहाल. लोकांना तुमची मते पटतील.
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN – Wednesday, November 23, 2022)
गळ्यात सोन्याची चेन घाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामावर लक्ष देणे जड जाऊ शकते. प्रिय किंवा आवडत्या व्यक्तिशी शालीनतेने वागा. महत्त्वाच्या कामांची यादी करून कामे पूर्ण करा. कार्यालयातील जबाबदारी चोख पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या. मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या कृती करायला प्राधान्य द्या.
शुभरंग : खाकी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, November 23, 2022)
गरजूंना अन्नदान करा. ताणतणाव, दडपणावर मात कराल. स्वत:तील कलात्मकता जोपासा. रिकामा वेळ धार्मिक किंवा सामाजिक कार्यात घालवाल. आळस सोडून कामाला लागावे लागेल. विनाकारण चिंता करणे सोडून द्या. लोकरीच्या कपड्यांची खरेदी कराल. घरातील लहान मुलांना समजून घ्याल. जोडीदाराकडून आवडता दागिना भेट स्वरुपात मिळेल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Wednesday, November 23, 2022)
वाहत्या पाण्यात कच्ची हळद प्रवाहित करा. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. इतरांना मदत करण्यासाठी वेळ द्याल. स्वत:ची काळजी घ्या. आरोग्य, सौंदर्य याबाबत योग्य व्यक्तिकडूनच सल्ला घ्याल. घेतलेले निर्णय लाभदायक असतील. इतरांच्या कामात लुडबूड करू नका.
शुभरंग : नारिंगी