दैनिक ‘सामना’चे कर्मचारी सचिन वैती यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’च्या वितरण विभागातील वरीष्ठ अधिकारी (रिडरशीप डेव्हलपमेंट) सचिन हरिश्चंद्र वैती यांचे 7 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 33 वर्षांचे होते. अतिशय मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या सचिन यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांशी दांडगा संपर्क होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

सचिन यांच्यावर पालघर जिह्यातील सफाळा एडवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, वृत्तपत्र कंपन्यांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेते अंतयात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले. त्यांचे दिवसकार्य गुरुवार, 16 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी होणार आहे.