हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनला दणका

24

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या जम्मू-कश्मीरमधील 13 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने आज दिली. त्यामुळे हिजबुल आणि सलाउद्दीनला मोठा दणका बसला आहे.

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट (पीएमएलए)नुसार ही कारवाई केली. एकूण सात मालमत्ता जप्त केल्या असून जम्मू-कश्मीरमधील हिजबुलचे समर्थक असलेल्या नावावर या मालमत्ता होत्या. सलाउद्दीनसह या सातही मालमत्ताधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सलाउद्दीन, मोहम्मद शफी शाह आणि इतरांवर कायदा-सुव्यवस्थेला अडथळा कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांना पैसा हवालाने

कश्मीरमध्ये हिजबुल सर्वात जास्त सक्रिय आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणे आणि दहशतवादी कारवाया करण्याचे काम ही संघटना करत आली आहे. सलाउद्दीन पाकिस्तानच्या रावळपिंडीतून दहशतवाद्यांना आदेश देत असतो. जम्मू-कश्मीर अफेक्टटिज रिलीफ ट्रस्ट (जेकेएआरटी)च्या माध्यमातून पैशाचा व्यवहार चालतो. यातील बरेचशे पैसे हवालाने येतात, असे ईडीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करतो म्हणून शाह याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या