
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्ली लिकर धोरण प्रकरणी दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांच्या नावाचा उल्लेख केला. मनीष सिसोदिया यांचे माजी सचिव सी अरविंद यांनी तपास एजन्सीला सांगितले होते की, राघव चढ्ढा यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती.
सी अरविंद यांच्या विधानानुसार, या बैठकीला पंजाबचे उत्पादन शुल्क आयुक्त वरुण रूजम, या प्रकरणातील आरोपी विजय नायर आणि पंजाब उत्पादन शुल्क संचालनालयातील इतर अधिकारीही उपस्थित होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीतील सीबीआय न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात प्रथमच मनीष सिसोदिया यांना आरोपी म्हणून नाव दिल्याच्या काही दिवसांनंतर आता हे नाव ईडीच्या आरोपपत्रात आले आहे. या प्रकरणाच्या संदर्भात आठ तास चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणेने सिसोदिया यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती.
हे असे प्रकरणात असे आरोप आहेत की दारू व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी दिल्ली सरकारचे 2021-22 चे उत्पादन शुल्क धोरण काही विशिष्ट व्यावसायिकांनाच अनुकूल होते. ज्यांनी त्यासाठी लाच दिली होती. मात्र या आरोपाचं आप नं जोरदार खंडन केलं होतं. नंतर हे धोरण रद्द करण्यात आलं.
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. पुरवणी आरोपपत्रात, ईडीनं म्हटलं आहे की नवीन लिकर धोरण हे केजरीवाल यांनी सूचवले होते आणि त्यांनी सिसोदियांसह विजय नायरला विशिष्ट अधिकार देऊन मदतही केली होती. या प्रकरणात अटक झालेला विजय नायर हा पहिला आरोपी होता.




























































