झुकेरबर्ग यांना पदावरून हटवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

फेसबुकवर सातत्याने होणारी टीका रोखण्यासाठी कंपनीने डिफाईनर्स पब्लिक अफेयर्स या जनसंपर्क कंपनीची मदत घेतल्याचा आरोप फेसबुकवर होत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुक कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांनी कंपनीचे अध्यक्ष मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने याबाबतचा खुलासा केला आहे. फेसबुकविरोधात लोकांच्या मनात असणारा प्रचंड राग दूर करण्यासाठी फेसबुकने अनेकदा अरबपती कार्यकर्ता जॉर्ज सोरोस यांची सेवा घेतली असून फेसबुकच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवर लोकांचा रोष कसा ओढवेल त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याची टीका सध्या फेसबुकवर होत असल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. फेसबुकमध्ये भागीदार असलेल्या ट्रिलियम ऍसेट मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष जोनास करॉन यांनी झुकेरबर्ग यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फेसबुक चुकीच्या पद्धतीने वागत असून ही एक कंपनी आहे. त्यामुळे कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही दोन्ही पदे वेगळी ठेवायला हवीत असेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.