धनंजय मुंडेंचे हेलिकॉप्टर भरकटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर येथे आयोजित असलेल्या सभेसाठी धनंजय मुंडे जात होते. त्यावेळी अचानक वाऱ्याच्या झोतामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोल्हापूरऐवजी ते बीड येथे उतरले. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळही होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसून हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.