नव्या संसदेत सावळा गोंधळ! सभागृहातच नाही तर दिल्लीतही उपस्थित नसलेल्या खासदाराला केलं निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा गुरुवारी विरोधकांनी सभागृहात लावून धरला होता. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल विरोधी पक्षाच्या 14 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं. मात्र या 14 खासदारांपैकी एक खासदार संसदेत काय तर दिल्लीत देखील उपस्थित नव्हता. उपस्थित नसलेल्या खासदाराला निलंबीत केल्याचे जाहीर केल्यामुळे संसदेतला सावळा गोंधळ समोर आला आहे.

संसदेत गोंधळ घातल्याचे सांगत सभापतींनी लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील एका खासदाराला निलंबित केले. यानिलंबीत खासदारांमध्ये द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचेही नाव होते. मात्र पार्थिबन हे संसदेत उपस्थितच नव्हते. अखेर निलंबित खासदारांच्या यादीतून सरकारने द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचे लोकसभेतील निलंबन मागे घेतले आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही कर्मचाऱ्याची चूक असल्याचे सांगितले. ”सदस्याची ओळख पटवण्यात कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्यांचे निलंबन मागे घेण्यास सबापतींना सांगितले’, असे जोशी यांनी सांगितले.

निलंबीत लोकसभा खासदार –
टीएन प्रथापन, काँग्रेस
हीबी एडेन, काँगेस
जोथिमनी, काँग्रेस
राम्या हरिदास , काँग्रेस
डीन कुरियाकोस, काँगेस
बेनी बेहनन, काँग्रेस
वी के श्रीकंदन, काँग्रेस
मोहम्मद जावेद, काँग्रेस
पीआर नटराजन, माकप
कनिमोई करुणानिधि, द्रमुक
के सुब्रमण्यन
एस वेंकटेशन, माकप
मणिकम टैगोर, काँग्रेस

राज्यसभा खासदार-

डेरेक ओब्रायान, तृणमूल