
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांचा जनसागर लोटला. मुंबईसह देशभरात जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना उपसचिव प्रवीण महाले देखील उपस्थित होते.
शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना प्रमोद कांबळे, सुधाकर वायकोळे, शंकर बुरसे, प्रसाद देशपांडे, हेमंत गिमावकर, मंगेश सरमळकर, धनंजय चाळके, स्वप्नील पाटील, विलास नायर.
शिवसेना घाटकोपर पूर्व विधानसभेच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करताना विभागप्रमुख सुरेश पाटील, विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ, अजित गुजर, अजित भायजे, प्रकाश वाणी.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कांजूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बाबा कदम, नगरसेविका श्वेता पावसकर, रवींद्र महाडिक, तानाजी मोरे, लीना मांडलेकर, राजेश पावसकर, शांतीलाल बोरुडे, कमलाकर पवार, प्रकाश शिंदे, मधुकर कदम, नरेंद्र माणगावकर, दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त योगेश वनघरे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मुरबाडच्या आंबेटेभे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसह खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयदेखील सुरू करण्यात आले. यावेळी योगेश वनघरे, अजय सावंत, सिद्धार्थ बनसोडे, सतीश शिंदे व त्याचे सहकारी उपस्थित होते.
दादर येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधाकर अभंग यांच्या व्याख्यानाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या-नगरसेविका विशाखा राऊत, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे, मीनल दुर्गे, शाखाप्रमुख प्रवीण नरे, अॅड. अशोक लोखंडे, शांता डोळस, विकास डोळस, प्रकाश फुलपगार, धर्मेंद्र डबडे, गणेश चौधरी, मंडळाचे प्रमुख सल्लागार मनोज पुंडे, उपाध्यक्ष संचालक प्रवीण पुंडे, चंद्रकांत हुलवळे, अजय खडे, राजेंद्र बोचरे, रामदास भोसले, तुषार भोसले, राजेंद्र पवार, बापुसो लोळे आदी उपस्थित होते.


























































