देखणे न देखणे – नाटकातील काळ व अवकाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मिनाक्षी पाटील
[email protected]

भारतीय नाट्यपरंपरेत काळ आणि अवकाश यांना स्थिर घटक न मानता रसोत्पत्ती, भावानुभूती व नाटय़ानुभव यांना पोषक अशी गतिशील रचनात्मक तत्त्वे मानले गेले आहे. नाटकाचा आशय, पात्रांचे मानसविश्व आणि प्रेक्षकांचा भावानुभव या सर्वांना आकार देण्यात त्यांची मध्यवर्ती भूमिका मानली गेली आहे.

नाटक ही साहित्य, संगीत, नृत्य, चित्र, स्थापत्य अशा विविध कलांचा समन्वय घडवणारी सर्वसमावेशक कला आहे. त्यामुळे नाटकाचे अस्तित्व केवळ शब्दांपुरते मर्यादित राहत नाही, तर त्यात काळ (ऊग्स) आणि अवकाश (एज्aम) या दोन मूलभूत घटकांमुळे त्याला एक वेगळे परिमाण प्राप्त होते. प्रत्येक नाटय़प्रयोग हा विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट अवकाशात घडणारा जिवंत अनुभव असल्यामुळे काळ व अवकाश हे नाटकाचे केवळ बाह्य घटक नसून त्याच्या रचनात्मक, सौंदर्यात्मक स्वरूपाचे मूलाधार ठरतात.

नाटकातील काळाचे मुख्यत तीन स्तर मानले जातात- कथाकाळ, रंगमंचीय काळ आणि प्रेक्षकानुभवाचा काळ. कथाकाळ अनेक वर्षांचा किंवा अनेक पिढय़ांचा असू शकतो, परंतु रंगमंचावर तो दोन-तीन तासांत साकारला जातो. त्यामुळे नाटकात संक्षेप, प्रसंगनिवड, दृश्यबदल आणि संवाद यांद्वारे कालसंकोचन (ण्दस्ज्rाssग्दह द ऊग्स) घडवले जाते. आधुनिक नाटकांमध्ये बऱ्याचदा फ्लॅशबॅक, फ्लॅश-फॉरवर्ड, स्वगत आणि स्मृतीदृश्ये यांसारख्या तंत्रांच्या वापरामुळे काळाची एकरेषीयता भंग केलेली दिसते. त्यामुळे नाटकामधील काळ हा वास्तवकाळापेक्षा कलात्मक स्वरूपाचा मानसिक स्तरावरील अनुभव देणारा काळ असतो.

नाटकातील पात्रे एका विशिष्ट अशा काळात जगत असतात, नाटकातील घटनाही एका विशिष्ट अशा काळात घडत असतात आणि त्यांचे अनुभवही कालसापेक्ष असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक पात्र विशिष्ट अवकाशात वावरत असते. त्या अवकाशाशी त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि राजकीय असे विविध स्तरांवरील संबंध जोडलेले असतात. त्यामुळे नाटकातील काळ आणि अवकाश यांच्या माध्यमातून केवळ दृश्यरचना किंवा कथानकाचा ाढम समजतो असे नव्हे, तर त्यातून नाटय़कृतीतील अर्थनिर्मितीच्या शक्यताही अधिक उलगडत जातात. तात्त्विक दृष्टिकोनातून पाहिल्यास काळ हा परिवर्तनाचा अनुभव आहे, तर अवकाश हा अस्तित्वाचा आधार आहे.

कोणतीही घटना ही काळाशिवाय घडू शकत नाही आणि कोणतेही अस्तित्व अवकाशाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. त्यामुळे नाटकात या दोन्ही संकल्पना स्वतंत्र नसून परस्परावलंबी आहेत. एखादा प्रसंग कुठे घडतो याइतकेच तो केव्हा घडतो हेही महत्त्वाचे असते. रंगमंचावरील दोन तासांच्या प्रयोगात अनेक वर्षांचे जीवन उलगडले जाऊ शकते, तर एका छोटय़ाशा रंगमंचावर वेगवेगळ्या कालखंडांचे प्रतीकात्मक दर्शनही घडू शकते. त्यामुळे नाटकातील काळ हा घडय़ाळातील वेळ नसून मानसिक स्तरावरील अनुभवाचा काळ असतो आणि नाटय़ावकाश हा कोणत्याही वास्तवातील भौतिक जागेपेक्षा काल्पनिक, प्रतीकात्मक स्तरावरील अर्थनिर्मितीचा सूचक असा मानसिक अवकाश असतो.

भारतीय नाटय़शास्त्रामध्ये रंगमंच, अभिनय, नेपथ्य, प्रवेश, निर्गमन, दृश्यरचना आणि प्रेक्षक यांचा अत्यंत सूक्ष्म विचार केलेला आढळतो. तसेच त्यात रंगमंचाच्या रचनेपासून अभिनयाच्या अंगांपर्यंत प्रत्येक घटकाचा विचार करताना नाटय़ावकाशाला व कालावकाशालाही विशेष महत्त्व दिलेले दिसते. भारतीय नाटय़परंपरेत कालसंकल्पना ही पीय आहे. ऋतू, युगे, पुनर्जन्म, स्मृती आणि नियती यांच्या आधारे जुन्या संस्कृत नाटकातील कथानक विकसित होत असल्याने काळाला केवळ एका सरळ रेषेतील प्रवास म्हणून पाहिले जात नाही, तर संस्कृत नाटकांमध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा परस्परसंबंध अगदी सहजपणे व्यक्त झालेला दिसतो.

कालिदासाच्या `अभिज्ञानशाकुंतलम्’मध्ये आश्रम, राजदरबार आणि स्वर्गीय परिसर अशी वेगवेगळ्या प्रकारची अवकाश रचना दिसते. या अवकाश बदलामुळे कथानकाचा भावार्थ अधिक व्यापक होतो. त्याचप्रमाणे मृच्छकटिकमध्ये नगरजीवन, राजकारण आणि सामान्य माणसाचे जग या विविध सामाजिक अवकाशांचे वास्तववादी चित्रण दिसते. भारतीय रंगपरंपरेत प्रतीकात्मकतेला विशेष महत्त्व असल्याने मोठय़ा नेपथ्यापेक्षा अभिनय, मुद्रा, वेशभूषा, संगीत आणि प्रकाश यांच्या साहाय्याने अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे नाट्यावकाश हा प्रत्यक्षापेक्षा अधिक सूचित असतो. प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीला सािढय करून अर्थनिर्मिती घडवणे हे भारतीय नाटय़परंपरेचे वैशिष्टय़ आहे. याच कारणामुळे भारतीय नाट्यपरंपरेत काळ आणि अवकाश यांना स्थिर घटक न मानता रसोत्पत्ती, भावानुभूती व नाट्यानुभव यांना पोषक अशी गतिशील रचनात्मक तत्त्वे मानले गेले आहे. नाटकाचा आशय, पात्रांचे मानसविश्व आणि प्रेक्षकांचा भावानुभव या सर्वांना आकार देण्यात त्यांची मध्यवर्ती भूमिका मानली गेली आहे.

भारतीय नाटय़ परंपरेप्रमाणेच पाश्चात्त्य नाटय़ परंपरेतही काळ आणि अवकाश या संकल्पनांचा सखोल विचार झालेला दिसतो. विशेषत ग्रीक शोकांतिकांपासून आधुनिक प्रयोगशील नाटकापर्यंत काल-अवकाशाच्या स्वरूपात सातत्याने परिवर्तन होत गेले आहे. नाटकाच्या आशयात, रचनेत आणि रंगमंचीय मांडणीत या परिवर्तनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. अरिस्टॉटलने मुख्यत कृतीची एकता यावर भर दिला.

पुढील काळात याच विचारातून काळ आणि स्थळ यांच्या एकतेची संकल्पनाही अभिजात युरोपीय नाटय़सिद्धांतात विकसित झाली. पुढे एकोणिसाव्या शतकात वास्तववादी रंगभूमीच्या उदयामुळे काल-अवकाशाला अधिक वास्तववादी स्वरूप प्राप्त झाले. रंगमंचावर घर, कार्यालय किंवा रुग्णालय यांसारखी प्रत्यक्ष जीवनातील स्थाने उभी राहू लागली. त्यामुळे आपण वास्तवातीलच एखादी घटना पाहत असल्याचा भास नाटकात निर्माण होऊ लागला. याच काळात नाटय़ावकाशाचे वास्तवाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. विसाव्या शतकातील नाटकात या काल-अवकाशातून व्यक्त झालेल्या मूर्त- अमूर्ततेकडे कसे पाहिले गेले हे पाहू या पुढील लेखात.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)