ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक, फारूक बटाटा सोबत काम करत असल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता एजाज खान याला एनसीबीने (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) अटक केली आहे. एजाज खान हा ड्रग्ज लॉर्ड फारूक बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा याच्या सोबत काम करत असल्याचा संशय एनआयएला आहे. मंगळवारी एनसीबीने एजाजची अनेक तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे.

यापूर्वी एनसीबीने ड्रग्ज लॉर्ड फारूक बटाटाची सुमारे 8 तास चौकशी केली व नंतर त्याला सोडण्यात आले. फारुखचा मुलगा शादाब याला गेल्या आठवड्यात एनसीबीने छापेमारी दरम्यान अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे दोन कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्त करण्यात आले. शादाबची चौकशीदरम्यान अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचे समजते आहे.

एजाज खान मंगळवारी राजस्थानहून मुंबईत दाखल झाला असता एनसीबीने त्याला नोटीस देत अटक केली. एनसीबीने एजाजशी संबंधित अंधेरी आणि लोखंडवाला मधील अनेक ठिकाणी छापे घातले. दरम्यान, छापेमारी दरम्यान एनसीबीला ड्रग्स सापडले की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या छापेमारी नंतर एनसीबीने एजाजला अटक केली आहे.