छत्तीसगढमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

naxal-attack
फाईल फोटो

काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात चकमक आणि शोध मोहिमेद्वारे 29 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आज पुन्हा एकदा सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून मोठी चकमक सुरू आहे.  बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमदमध्ये अनेक ठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. अबुझमदच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि एसटीएफची पथके  आहेत. या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान पोहोचवण्यात जवानांना यश आले आहे.

या कारवाईवर आयजी पी सुंदरराज यांच्यापासून एसपी प्रभात कुमार या सर्वांचे लक्ष आहे. या नक्षलवाद्यांना जवानांनी अनेक ठिकाणी घेरले असून त्यांच्यात चकमक सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपुर जिल्ह्यात जवान नक्षलग्रस्त असलेल्या ठिकाणी आहेत. नारायणुरच्या एसपी प्रभात कुमार यांनी चकमकीत नेमके किती नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले हे सांगता येत नसले तरी सुत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमक सुरु असून काही दिवसांपूर्वी कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

पीटीआयच्या वृत्तानुसार, छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी सात महिला नक्षलवाद्यांसह 23 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी भैरमगढ येथील एका कमिटीवर सक्रिय होते.