World Cup 2023 – इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून रॉय गेला, ब्रुक आला

इंग्लंड संघाने आपल्या तात्पुरत्या वर्ल्ड कप संघातून धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला डच्चू देताना हॅरी ब्रुकला संघात घेतल्याचे जाहीर करत आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. तसेच आदिल राशीद आणि मार्क वूड पूर्णपणे फिट नसले तरी त्यांना संघात ठेवले आहे.

इंग्लंडला आपला वर्ल्ड कप संघ सर्वात आधी जाहीर केला होता. तसेच हा संघ अंतिम नसल्याचे जाहीर करताना हॅरी ब्रुकसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे अद्यापही बंद झाले नसल्याचे कर्णधार जोस बटलर म्हणाला होता. त्यानुसार त्यांनी ब्रुकला प्राधान्य देताना गेला वर्ल्ड कप खेळलेल्या जेसन रॉयला संघाबाहेर काढले.

रॉय गेले काही दिवस पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त होता. त्यात त्याची कामगिरी समाधानकारक होत नव्हती. त्यामुळे निवड समितीने हा धाडसी निर्णय घेतला. आता त्याच्या जागी ब्रुक सलामीला उतरू शकतो.