
‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ अशा चित्रपटांतून काजोलने प्रेक्षकांना भुरळ पाडली. आजही काजोल चाहत्यांची फेव्हरेट आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकतेच तिने फिकट हिरव्या शिमरी साडीमधील फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये ती कमालीचे सुंदर दिसत आहे. या साडीबरोबर तिने पायात ब्लॉक हिल्ड सॅण्डल घातली आहे, तिने साडीवर डायमंड ड्रॉपलेट इअरिंग्स आणि स्टेटमेण्ट रिंग घातली आहे. तर साडीवर केस मोकळे सोडले आहेत. चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. डोळ्यांना आयशॅडो लावले आहे, गालावर ब्लश आणि ओठांवर न्यूड लिपस्टिक लावली आहे.





























































