बिपाशा बासूच्या मुलीच्या हृदयाला 2 छिद्र, 6 तासांची शस्रक्रिया अन… अभिनेत्री झाली भावूक

अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या मुलीमुळे कायम चर्चेत असते. बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर गेल्या वर्षी मुलीला जन्म दिला. मात्र जन्माच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी मुलीच्या हृदयात दोन छिद्रे असल्याचे समजले. हे ऐकल्यानंतर बिपाशा आणि करण या बातमीने प्रचंड हादरले होते.नुकतेच तिने याबाबत सोशल मीडियावर खुलासा केला.

बिपाशाने नुकतेच अभिनेत्री नेहा धुपियासोबत लाइव्ह चॅट दरम्यान याबाबत खुलासा केला. ती म्हणाली देवी हिच्या हृदयात एक नव्हे दोन छिद्रे होती. तिला जन्मापासूनच वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) या आजाराने ग्रासले होते. देवीच्या जन्माच्या अवघ्या तीन महिन्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. भावूक होत बिपाशा म्हणाली, सर्वसामान्य पालकांपेक्षा आमचा हा प्रवास खूप वेगळा होता. त्यावेळी फार वेगळी परिस्थिती होती. हे कोणत्याही आईच्या बाबतीत घडू नये अशी माझी इच्छा आहे. मुलीच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी तिच्या हृदयात दोन छिद्रे असल्याचे कळले आणि पायाखालची जमिनच सरकली.मी विचार केला होता मी हे शेअर करणार नाही, पण मी हे सांगत आहे, कारण मला वाटतं की, अनेक माता आहेत ज्यांनी या प्रवासात मला मदत केली.

बिपाशा बासूने पुढे सांगितले की, तिच्यासाठी आणि करणसाठी हा मोठा धक्का होता. त्यावेळी याबाबत आम्ही आमच्या कुटुंबीयांनाही सांगितले नव्हते. आम्हाला नेमके समजत नव्हते की व्हीएसडी नेमके काय आहे. हा वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आहे. तो काळ आमच्यासाठी फार वाईट होता.आम्ही त्याबाबत आमच्या कुटुंबाशी चर्चा केली नाही.आम्ही दोघेही हादरलो होतो. काय करावे काय करु नये काही कळत नव्हते. आम्हाला तिच्या आगमनाचा जल्लोश करायचा होता पण आम्ही सुन्न झालो होतो. पहिले पाच महिने आमच्यासाठी खूप कठीण होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाने पुढे सांगितले की, छिद्र मोठे असल्याने देवीवर तीन महिन्यांत शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी सांगितले की, ते छिद्र आपोआप बरे होते की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला दर महिन्याला स्कॅन करायला सांगण्यात आले होते, पण छिद्र मोठे असल्याने शस्त्रक्रिया आवश्यक असून ही वेळ शस्त्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले. असे तेव्हा होते जेव्हा बाळ तीन महिन्यांचे आहे. तुम्ही बाळावर ओपन हार्ट सर्जरी कशी करू शकता? हा विचार करूनही वेदना होतात असहाय्य वाटू लागते. आपल्या भावना व्यक्त करत बिपाशा म्हणाली,करण आणि मी देवी नॅचरल पद्धतीने ठिक होण्याची वाट पाहत होतो. पण पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात काहीच तसे जाणवले नाही आणि आम्ही निराश झालो. पण मुलीला काही करुन ठिक करायचे असे मनाशी ठरवले. मन घट्ट करुन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.मात्र करण त्यासाठी तयार नव्हता. द्विधा मनस्थिती होती अखेर करणने ते मान्य केले आणि देवीची शस्त्रक्रिया 6 तास चालली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता बिपाशाची छोटी परी बरी आहे.