पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी फाय फौंडेशनचा एक कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना या महामारीच्या रोगाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी करीता इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशन या संस्थेतर्फे एक कोटींचा सहाय्यता निधीचा धनादेश प्रांताधिकारी यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.

जगभरात पसरलेल्या कोरोनाने हिंदुस्थातही पसरत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढ्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एक कोटींचा धनादेश प्रांत डॉ. विकास खरात यांच्याकडे डॉ. एस. पी. मर्दा, समीर कुलकर्णी, आमोद कुलकर्णी यांनी दिला. यावेळी पालिका मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्यधिकारी सुनीलदत्त संगेवार हजर होते. फाय फौंडेशनचे प्रमुख पंडितराव कुलकर्णी यांनी यापूर्वीही अनेकवेळा राष्ट्रीय संकटावेळी मोठा निधी दिला होता.