फिफा २०१८ : स्विडनकडून दक्षिण कोरियाचा पराभव

18

सामना ऑनलाईन । मॉस्को

फिफा विश्वचषकातील फ गटातील सामन्यात स्विडनने दक्षिण कोरियाचा १-० असा पराभव केला. सोमवारी झालेल्या या सामन्यात स्विडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅक्विस्टने ६५ व्या मिनिटाला गोल करत स्विडनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दक्षिण कोरियाचे आक्रमण शेवटपर्यंत थोपवून घरत स्विडनने विश्वचषकात उलटफेर केला.

निजनी नोवगोरोड मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ करत गोलपोस्टवर आक्रमण केली, परंतु गोल झळकावण्यात ते अपयशी राहिले. त्यानंतर ६५ व्या मिनिटाला स्विडनच्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने अडवल्याने दक्षिण कोरियाला पंचांनी पेनल्टी ठोठावली. पेनल्टीवर स्विडनच्या कर्णधाराने गोल केला आणि मैदानावर चाहत्यांना तुफानी जल्लोष केला. हाच सामन्यातील निर्णायक गोल ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या