
पोलंडला खऱया अर्थाने बाद फेरीत पोहोचविण्याची किमया केली ती सौदी अरेबियानेच. मेक्सिकोबरोबरचा सलामीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पोलंडने स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना सौदीचा 2-0 ने पराभव केला होता. त्यामुळे पोलंड सी गटाच्या गुणतालिकेत अनपेक्षितपणे दुसऱया क्रमांकावर होता. पण आज त्यांना बाद फेरीत मजल मारण्यासाठी विजय किंवा बरोबरीचा एक गुण आवश्यक होता. असे असूनही ते हरले आणि हरूनही सौदी अरेबियाविरूद्ध नोंदविलेला 2-0 असा विजय आणि सौदीने सामना संपायला काही सेपंद असताना मेक्सिकोवर ठोकलेल्या गोलाने पोलंडला अंतिम सोळात स्थान मिळवून दिले. अर्जेंटिनाने सलग दुसऱया विजयासह सी गटातून अव्वल स्थान पटकावले.




























































