मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी पाच रुग्णांचा मृत्यू

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असताना देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयात रात्री दोन ते अडीचच्या सुमरास ऑक्सिजन संपला. ऑक्सिजन अभावी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा पोलिसांनी तातडीने ऑक्सिजनचे सिलिंडर रुग्णालयात पोहोचवले. तेव्हा इतर रुग्णांना वाचवण्यात यश आले.

आपली प्रतिक्रिया द्या