
आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी नवे सरकार आग्रही आहे. त्यासाठी आरे हे जंगलच नाही असा दावाही केला जात आहे. पर्यावरणप्रेमींनी मात्र आरे हे जंगल आहे याचे पुरावेच दिले आहेत. कारशेड उभारले जातेय त्या ठिकाणी बिबटय़ा, रानमांजर, मुंगूस आणि अन्य जंगली प्राण्यांचा अधिवास आहे. ते जंगली प्राणी वन विभागाच्या कॅमेऱयात पैद झाले आहेत. आरे हे जंगल असल्याचा हा ठोस पुरावा आहे.
‘मेट्रो-3’ या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गासाठी उभारण्यात येणाऱया भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी आरेमध्येच कारशेड उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आरेच्या जंगलात वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याने आरेमधील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला होता. इतकेच नव्हे तर आरेतील 812 एकरचा परिसर जंगल म्हणूनही घोषित केला. मात्र शिंदे सरकारचा आरेमध्येच कारशेड बनवण्याचा हट्ट आहे. पर्यावरणप्रेमी, आरेतील रहिवासी आणि विविध संघटना त्याला जोरदार विरोध करत आहेत. त्यासाठी सातत्याने आंदोलनेही सुरू आहेत.
आरेमधील वन्यजीवांचे दस्तावेजीकरण करण्याचे आदेश माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्या आदेशानंतर ठाणे वन विभागाने आरेतील पिकनिक पॉईंटच्या समोर असणाऱया मेट्रो कारशेडमध्ये तीन कॅमेरे लावले होते. नोव्हेंबर 2021 ते जून 2022 कारशेडच्या परिसरात पाच बिबटय़ांचा वावर असल्याचे दिसून आले. त्यातील दोन नर आणि दोन मादी बिबटे आहेत. या बिबटय़ांचा कारशेडमध्ये फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही वावर असतो असे दिसून आले आहे. बिबटय़ाची एक मादी तिच्या पिलासह कॅमेऱयात कैद झाली. करडय़ा रंगाचा मुंगूस आणि बंगाली घोरपडही आढळली.
जंगली प्राण्यांचा वावर म्हणजे आरे हे जंगलच
बिबटे, मुंगूस, घोरपड, नाग, अजगर, घोणस, सरडे असे प्राणी आरे कारशेडमध्ये आढळणे म्हणजे आरे हे जंगलच असल्याचा ठोस पुरावाच आहे. आरे हे जंगल नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱयांना हे वास्तव आता स्वीकारावेच लागेल. कॅमेऱयात पैद झालेला हा पुरावा आम्ही न्यायालयात सादर करू.
– स्टॅलिन दयानंद, ‘वनशक्ती’ प्रकल्प संचालक
राज्याचा वन विभाग आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या सहकार्याने केलेल्या या अभ्यासातून आरे मेट्रो-3 कारशेडच्या परिसरात जैवविविधता असल्याचे खरे चित्र समोर आले आहे. विकास हा शाश्वत असला पाहिजे. आम्ही मेट्रोचे काम थांबवले नव्हते तर मेट्रोचे 3,4,6,14 या सर्व मार्गांसाठी डेपो हलवत होतो.
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते






























































