चार दहशतवाद्यांना दिल्लीत अटक, हल्ल्याचा कट उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने ‘आयएसआय’साठी काम करणाऱ्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी तिघांना पंजाब तर एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. हे चौघेही ‘आयएसआय’च्या हँडलर शहजाद भट्टीच्या संपकार्कात होते.