
14 एप्रिल 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेवर अवघ्या दोन महिन्यांत भलेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यासाठी तब्बल 12 हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मोठे खड्डे पडल्याचा पुरावाच काँग्रेसने दिला आहे.
दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेवर खड्डे पडल्याने या रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि फंडाची हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हा काही एकटा रस्ता नाही. जेथे खड्डे पडले आहेत. संपूर्ण देशभरातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स खराब होत आहेत. देशात पूल असो की रस्ते, हायवे असो की, पाण्याच्या टाक्या, रेल्वे स्टेशन असो की, एअरपोर्टचे छत. प्रत्येक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर खराब होत आहे.

























































