FIFA World Cup 2026 इस्माईल सबारीला 542 कोटींची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जग फिफा विश्वचषकाच्या उत्साहाने भारले असताना जर्मन फुटबॉलमधील अग्रगण्य संघ बायर्न म्युनिचने एक मोठी घोषणा केली आहे. मोरोक्काचा स्टार खेळाडू इस्माईल सबारीला अधिकृतपणे आपल्या संघात सामील करून घेतले आहे. विश्वचषकाच्या ऐन मध्यभागी झालेल्या या मोठय़ा करारासाठी बायर्न म्युनिचने हस्तांतरण शुल्क म्हणून तब्बल 50 दशलक्ष युरो, म्हणजेच अंदाजे 542 कोटी रुपये दिले आहेत. खरं तर हे हस्तांतरण गेल्या काही आठवडय़ांपासून चर्चेत आहे आणि सूत्रांनुसार, स्पर्धेदरम्यान मोरोक्कन संघ न्यू जर्सीमध्ये सराव करत असताना सबारीने हस्तांतरणापूर्वीच्या वैद्यकीय चाचणीसाठी एक सराव सत्र चुकवले होते. जेणेकरून तो जर्मन दिग्गज क्लबसोबत आपला करार वेळेत निश्चित करू शकेल.