
शुभमन गिलला पहिला कसोटी दौरा इंग्लंडचा होता. हिंदुस्थानने लढवय्यापणा दाखवत ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. पण याच मालिकेत आपल्यावर अन्याय झाल्याचे मुंबईकर अष्टपैलू शार्दुल ठाकूरने म्हटले आहे. शुभमन गिल किंवा गौतम गंभीर यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर शार्दुलने अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे.
लीड्स कसोटीमध्ये शार्दुलने 10 षटकांत 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि त्यामुळे संघाचे दमदार कमबॅक झाले होते. पण त्यानंतर शार्दुलला शुभमन गिलने गोलंदाजीच दिली नसल्याचे पाहायला मिळाले. याबाबत शार्दुल म्हणाला की, ‘मी या सामन्यात कमी वेळात दोन विकेट्स मिळवल्या आणि त्यामुळेच संघाला दमदार कमबॅक करता आले होते, पण एवढे यश मिळवून देऊनही त्यानंतर मला गोलंदाजी दिली नाही. जर मला गोलंदाजी दिली असती तर अजून विकेट्स मिळवत मी संघाला मदत करू शकलो असतो.’
शार्दुल पुढे म्हणाला की, ‘हिंदुस्थानसाठी खेळताना मी चांगले योगदान दिले आहे आणि मला आशा आहे की, यापुढेही मला हिंदुस्थानी संघात संधी मिळेल.’

























































