
तेल, तूप, दूध, मिठाई, अगदी पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. पण आता मदिरेत भेसळ करण्यापर्यंत उत्पादकांची मजल गेली आहे. या भेसळीविरोधात हिंदुस्थानी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) मोठी कारवाई केली आहे. एफएसएसएआयने मॅकडोवेल, ओल्ड मंक, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंजसह मद्याच्या अनेक ब्रँड्सवर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे तळीराम भडकले असून भेसळखोर कंपन्यांना त्यांचा तळतळाट भोवणार आहे.
अन्नपदार्थांच्या सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही याची खात्री करण्यासाठी एफएसएसएआयने सध्या तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत मद्य पंपन्यांची बनवाबनवी समोर आली. काही मद्य उत्पादनांमध्ये केवळ त्या ब्रँडचा फ्लेवर मिसळला जात असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आढळून आले. मद्याला नैसर्गिक चव आणि गंध येण्यासाठी त्यास ठरावीक वेळ देणे आवश्यक असते. त्यात गुळाचा पाक, माल्ट किंवा द्राक्षे यांसारखे नैसर्गिक घटक वापरावे लागतात. मात्र या नैसर्गिक पद्धतीला फाटा देऊन काही उत्पादक त्यात कृत्रिम घटक मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही उत्पादने निकृष्ट दर्जाची ठरतात. जगभरात मान्य पद्धतीनुसार रममध्ये रम फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवर मिसळण्याची कोणतीही पद्धत नाही, असे एफएसएसएआयचे म्हणणे आहे.
या ठिकाणी विक्रीस बंदी
मध्य प्रदेशातील युनायटेड स्पिरिट्सच्या एंटीक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रू बेवरेजेजची बॅगपाइपर डीलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डीलक्स XXX रमच्या विक्रीस मनाई केली आहे. महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर यांच्याकडून बनवल्या जाणाऱया ओल्ड मंकच्या तीन वेरियंटवर बंदी घालण्यात आली आहे.
भावनाओं को समझो!
रंग वही, बोतल वही,
बस रूह बदल गई…
कंबख्त मिलावट ने आज
महफिल की आबरू बदल दी!
अब मय में वो पहले जैसा
सुरूर कहाँ मिलता है…
पैसा पूरा देने पर भी
यहाँ सिर्फ दर्द मिलता है!
































































