
प्रसाद नायगावकर। यवतमाळ
घराचा सज्जा अंगावर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी जिल्ह्यातील आलेगाव येथे घड़ली आहे. सुधीर किसन राठोड आणि तुळशीदास राठोड अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सुमन पवार ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
आसेगाव येथे मंगळवारी पावसाने थैमान घातले होते. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे गावातील अनेक झाड व वीजेचे खांब उन्मळून पडले होते. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. याचदरम्यान सुधीर व तुळशीदास यांच्या अंगावर घराचा सज्जा कोसळला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तर सुमन पवार जखमी झाल्या. दरम्यान, संततधार पावसामुळे वीज वाहिनीचे सहा टॉवर कोसळले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील मजुरांमध्येही भीती निर्माण झाली आहे.मंगळवारच्या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली होती.





























































